Also visit www.atgnews.com
ICSE बोर्डाच्या फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर
काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CICSE) ने आयसीएसई (दहावी) व आयएससी (बारावी) च्या कंपार्टमेंट व श्रेणीसुधार परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. सीआयसीएसई बोर्ड ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट आणि श्रेणीसुधार परीक्षा आयोजित करणार आहे. मंडळाने बुधवारी ही माहिती दिली. अधिकृत माहितीनुसार, कंपार्टमेंट व श्रेणीसुधार परीक्षा संपल्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता निकाल जाहीर केला जाईल. आयसीएसई बोर्डाने असेही म्हटले आहे की कंपार्टमेंट परीक्षेत यशस्वी न होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल. परंतु, जे विद्यार्थी श्रेणीसुधार परीक्षेत सहभागी होणार नाहीत त्यांना गुण सुधारण्याची दुसरी संधी दिली जाणार नाही. आयसीएसई, आयएसई परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :- - आयसीएसई कंपार्टमेंट परीक्षा २०२०: ६ ते ७ ऑक्टोबर - आयसीएसई सुधार परीक्षा २०२०: ६ ते ९ ऑक्टोबर - आयएससी कंपार्टमेंट परीक्षा २०२०: ६ ऑक्टोबर - आयएससी सुधार परीक्षा २०२०: ६ ते ७ ऑक्टोबर सीआयसीएसई बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून म्हणाले, 'गर्दी टाळण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे. त्यांनी मास्क व सॅनिटाझर्स सोबत बाळगणे आवश्यक आहे, तर हातमोजे वापरणे वैकल्पिक आहे.' जुलै महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाने जाहीर केला होता. त्यानुसार दहावीत ९९.३४ टक्के तर बारावीत ९६.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iZE8Ci
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments