ICSI CSEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

CSEET Result 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) २०२० चा निकाल जारी केला आहे. ही परीक्षा २९ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत घेण्यात आली होती. निकाल संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर १७ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यांना संस्थेची अधिकृत वेबसाईट icsi.edu वर जाऊन निकाल पाहाता येईल, आणि डाऊनलोडही करता येईल. आम्ही उमेदवारांच्या माहितीसाठी या वृत्ताच्या अखेरीसदेखील निकालाची थेट लिंक देत आहोत. ICSI CSEET 2020 परीक्षेचा निकाल कसा डाऊनलोड करावा? - आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. संकेतस्थळाचा पत्ता - icsi.edu - 'Download Score Card' नावाचा पर्याय होमपजेवर उपलब्ध असेल. तेथे क्लिक करावे. - रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख यांची नोंद करावी. - ICSI CSEET 2020 परीक्षेचे स्कोअरकार्ड आता स्क्रीनवर दिसेल. - ते डाऊनलोड करावे आणि भविष्यातील उपयोगासाठी त्याचे एक प्रिंट आऊटही घेऊन ठेवावे. ज्या विद्यार्थ्यांना ICSI CSEET 2020 परीक्षेत उत्तीर्ण होता आलेले नाही, त्यांच्यासाठी डिसेंबर २०२० मध्ये पुन्हा एकदा ही परीक्षा देण्याची संधी आहे. याबाबतची अधिक माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. ICSI CSEET 2020 निकालाच्या थेट लिंकसाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ha2Lhz
via IFTTT

Post a Comment

0 Comments