Also visit www.atgnews.com
क्यूएस ग्लोबल रँकिंगमध्ये देशातील दोन IIM टॉप ५० मध्ये
QS Global MBA Rankings 2021: QS ग्लोबल एमबीए रँकिंग २०२१ मध्ये देशातील दोन आघाडीच्या मॅनेजमेंट संस्था IIM अहमदाबाद आणि IIM बंगळुरू यांनी जगातल्या पहिल्या ५० टॉप मॅनेजमेंट संस्थांमध्ये स्थान पटकावले आहे. आयआयएम अहमदाबाद ३१ व्या क्रमांकावर तर आयआयएम बंगळुरूच्या दोन वर्षांच्या एमबीए कोर्सने ३५ वे स्थान पटकावले आहे. या दोन संस्थांसह आयआयएम कोलकाता क्यूएस ग्लोबल एमबीए रँकिंग २०२१ मध्ये ५१ व्या स्थानी आहे. मागील वर्षीच्या क्यूएस ग्लोबल एमबीए रँकिंगच्या तुलनेत आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम बंगळुरूच्या यंदाच्या स्थानात घसरण झाली आहे. आयआयएम अहमदाबात चार तर आयआयआम बंगळुरूचे स्थान नऊ अंकांनी घसरले आहे. गेल्या वर्षी QS मास्टर्स इन मॅनेजमेंट श्रेणीत IIM बंगळुरूने भारतीय संस्थांमध्ये अव्वल तर जागतिक पातळीवर २६ वे स्थान पटकावले होते. संस्थेचा स्कोर १०० पैकी ६३.१ होता. आयआयएम अहमदाबादच्या पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेटमेंट अभ्यासक्रमाला २७ वे स्थान मिळाले होते. आयआयएम कोलकाता ४६ व्या स्थानी होते. यावर्षी QS बिझनेस मास्टर्स रँकिंग २०२१ मध्ये एशिया पॅसिफिक क्षेत्रात ग्रेट लॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चेन्नई, आयआयएम कोझिकोड, आयआयएम इंदूर, आयआयएम लखनऊ आणि आयआयएम उदयपूरसह अनेक संस्थाना १०१+ रँकच्या निकषात स्थान दिले गेले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j4gDrN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments