Also visit www.atgnews.com
JEE Main परीक्षा सुरळीत; कसा होता पेपर? जाणूृन घ्या...
JEE Main 2020: जेईई मेन परीक्षेची दोन्ही सत्रे आज संपूर्ण देशभर सुरळीतपणे पार पडली. देशभरात एकूण ९ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. १ ते ६ सप्टेंबर या कालावधील ही परीक्षा होणार आहे. पहिले सत्र आज सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत पार पडले. पहिल्या दिवशी बी.आर्क आणि बी. प्लानिंग या विषयांची परीक्षा झाली. बीटेकसाठी परीक्षा बुधवारी २ सप्टेंबर पासून सुरू होणार असून ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी काय सांगितलं? विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या शिफ्टसाठी परीक्षा केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होते. परीक्षा ९ वाजता सुरू झाली. पेपर २ साठी विद्यार्थ्यांना केवळ पेन्सिल बॉक्स (आकृत्यांसाठी), अॅडमिट कार्ड, आधार कार्ड आणि पारदर्शी पाण्याची बाटली घेऊन जाण्यासाठी परवानगी होती. बॉल पॉइंट पेन परीक्षा केंद्रांच्या आत देण्यात आले. कॉम्प्युटर स्क्रीनवर टाइम लॉकही देण्यात आलं होतं. कोविड - १९ चा पार्श्वभूमीवर गेटवर बायोमेट्रिक अटेंडन्स घेतली गेली नाही. परीक्षा हॉलमध्येही पर्यवेक्षकांना एक टॅबच्या सहाय्याने विद्यार्थ्याचे फोटो क्लिक केले आणि अॅडमिट कार्ड दूरूनच स्कॅन केले. दोन्ही शिफ्टसाठी खुर्च्या, संगणक वेगवेगळे होते. तत्पूर्वी सकाळी विद्यार्थी स्वत:च सॅनिटायझेशन करून आत जात होते. घरून लावून आणलेले मास्क हटवून त्यांना परीक्षा केंद्रावर देण्यात आलेला सर्जिकल मास्क घालणे अनिवार्य होते. मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने त्यांची तपासणी करण्यात आली. पेपर अॅनालिसिस आणि पॅटर्न पार्ट -१ (मॅथ्स) : या विभागात २५ प्रश्न होते. २० एमसीक्यू प्रकारचे प्रश्न होते आणि ५ न्यूमरिकल प्रश्न होते. एमसीक्यूसाठी प्रत्येक योग्य उत्तराला ४ गुण होते आणि अयोग्य उत्तराला -१ असे नकारात्मक मू्ल्यांकन होते. न्यूमरिकलसाठी योग्य उत्तराला ४ गुण होते. हे संपूर्ण सेक्शन १०० गुणांचे होते. पार्ट - २ (अॅप्टिट्यूड) : या विभागात एकूण ५० प्रश्न होते. सर्व प्रश्न एमसीक्यू प्रकारचे होते. २०० गुणांचं हे सेक्शन होतं. प्रत्येक योग्य उत्तराला ४ गुण, उत्तर न दिल्या ० गुण होते. तर चुकीच्या उत्तराला नकारात्मक मूल्यांकन होते. १ गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा केला जाणार आहे. पार्ट ३ (ड्रॉइंग) : यात दोन प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाला ५० गुण होते. एकूण गुण १०० होते. जानेवारी परीक्षेच्या तुलनेत हा पेपर सोपा होता, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. प्रश्नावलीत कोणतीही चूक नव्हती. न्यूमरिकल प्रश्न मात्र जानेवारी परीक्षेच्या तुलनेत आजच्या परीक्षेत थोडे किचकट होते. जास्त आकडेमोड गरजेची होते. कॅल्क्युलस आणि को-ऑर्डिनेट जॉमेट्री या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hOwnyt
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments