MHT CET 2020: पीसीएम ग्रुपचे हॉलतिकीट जारी

MHT-CET 2020: महाराष्ट्र सीईटी कक्षाने सामायिक प्रवेश परीक्षेसाठी () प्रवेश पत्र जाहीर केले आहेत. सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट वर हे अॅडमिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ्स अर्थात पीसीएम (PCM) ग्रुपसाठी हे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. याआधी तीन दिवसांपूर्वी २६ सप्टेंबर रोजी PCB गटाचे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले होते. या अॅडमिट कार्डवर परीक्षा केंद्रासंबंधीची माहिती, रिपोर्टिंगची वेळ, दिवस आणि अन्य माहिती उपलब्ध आहे. MHT-CET 2020 चे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डची आवश्यकता भासेल. MHT-CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड करायचे वाचा... - सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ .mahaonline.gov.in वर जा. - यानंतर हॉल तिकिट या पर्यायावर क्लिक करा. - तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका. - नंतर आपला विषय PCB / PCM यापैकी एक निवडा. - यानंतर सर्च बटणावर क्लिक करा. - MHT CET हॉलतिकीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल. - हे हॉलतिकीट तुम्ही डाऊनलोड करून त्याचं एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा. MHT-CET 2020 परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हॉलतिकीट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. हॉलतिकीट शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश दिला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i7uo7G
via IFTTT

Post a Comment

0 Comments