NEET 2020: निकालाआधी पूर्ण करा 'हे' काम

NEET 2020 Update: एम्स (AIIMS), जिपमर (JIPMER) सह देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि बीडीएस (MBBS/BDS) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र निकालाआधी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीटसंबंधी एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यात विद्यार्थ्यांना निकालाच्या आधी एक महत्त्वाचं काम करण्यास सांगितले आहे. कशाबद्दल आहे परिपत्रक? नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची एक संधी दिली आहे. जे विद्यार्थी १३ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या परीक्षेत सहभागी झाले होते, त्यांनी पुन्हा एकवार आपला नीट परीक्षा अर्ज पाहायचा आहे. जर त्यात कुठली दुरुस्ती करायची असेल तर ती आताच करायची आहे. कारण त्या अर्जातली माहितीच विद्यार्थ्यांना नीट निकालात असणार आहे. कोणत्या रकान्यात करू शकता दुरुस्ती? आईचे नाव वडिलांचे नाव लिंग कॅटेगरी पर्सन विथ डिसअॅबिलिटी स्टेट कोड एलिजिबिलिटी नॅशनॅलिटी दुरुस्ती करण्यासाठी नीट संकेतस्थळावरील लिंक अॅक्टिव्ह करण्यात आली आहे. विद्यार्थी ३० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जात दुरुस्ती करु शकतात. शुल्क जमा करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११.५० पर्यंतचा वेळ दिला गेला आहे. पुन्हा भरावे लागणार का शुल्क? परिपत्रकात असं म्हटलं आहे की अर्जात पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा शुल्क भरावे लागणार की नाही हे कुठल्या प्रकारची दुरुस्ती केली जाणार त्यावर ठरणार आहे. जर तुम्हाला कुठल्या अशा रकान्यात दुरुस्ती करायची आहे, ज्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यायचे आहे, तर ते तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे करू शकता. ही चूक करू नका एनटीए ने सांगितलं आहे की ईमेल, फॅक्स किंवा अन्य माध्यमांद्वारे अर्जात सुधारणा करण्यासंबंधी कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. ही प्रक्रिया तुम्हाला स्वत: वेबसाइटला भेट देऊन पूर्ण करायची आहे. एनटीएचे परिपत्रक वाचण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mMu5mn
via IFTTT

Post a Comment

0 Comments