Also visit www.atgnews.com
UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०: प्रवेश पत्र जारी
Prelims 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० चे अॅडमिट कार्ड (प्रवेशपत्र) जारी करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते upsconline.nic.in या संकेतस्थळामार्फत प्रवेश पत्र मिळवू शकतात. यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० च्या अॅडमिट कार्डची थेट लिंक या बातमीत पुढे देण्यात आली आहे. उमेदवार या लिंकवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. UPSC CSE Prelims 2020: अॅडमिट कार्ड कसं डाऊनलोड करायचं? - यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जा. लिंक पुढे देण्यात आली आहे. - होम पेजवर व्हॉट्स न्यू सेक्शनमध्ये ई-अॅडमिट कार्ड सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा २०२० लिंकवर क्लिक करा. - आता नवं पेज उघडेल. येथे सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स एक्झाम २०२० च्या समोर क्लिक हियर लिंकवर क्लिक करा. - पुन्हा एक नवं पेज उघडेल. येथेयूपीएससी सिव्हिल सर्विस प्रीलिम्स एडमिट कार्ड 2020 च्या समोरील लिंकवर क्लिक करा. ई-अॅडमिट कार्ड इंस्ट्रक्शन पीडीएफ उघडेल. यात सर्वात शेवटी दिलेल्या प्रिंट टॅबवर क्लिक करा. - एक आणखी नवं पेज उघडेल. येथे रजिस्ट्रेशन आयडी किंवा रोल नंबर यापैकी एक पर्याय निवडा. हे पर्याय अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आहेत. तुमचा आयडी किंवा रोल नंबर देऊन सबमीट करा. - आता तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा. कधी होणार परीक्षा? कोविड - १९ मुळे यूपीएससीने सिव्हिल सेवा पूर्व परीक्षा २०२० चे शेड्युलह बदलले होते. नव्या वेळापत्रकानुसार देशभर ४ ऑक्टोबर २०२० रोजी ही परीक्षा होणार आहे. अॅडमिट कार्ड परीक्षेच्या दिवसापर्यंत वेबसाइटवर उपलब्ध राहील. यादरम्यान परीक्षार्थी आपल्या सुविधेनुसार ते डाऊनलोड करू शकतात. लक्षात घ्या की ई-अॅडमिट कार्डाचे प्रिंट आऊट, ओरिजनल फोटो आयडी प्रूफशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना आपलं प्रवेशपत्र सांभाळून ठेवावं लागेल. कारण याची गरज निकालाच्या घोषणेनंतर आणि त्यानंतरही लागेल. UPSC CSE Prelims admit card 2020 डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंकसाठी UPSC च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lE0Kd6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments