UPSC परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Civil Service Prelims 2020 update: केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) च्या नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ला आता केवळ चार दिन शिल्लक राहीले आहेत. परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. पण तूर्त या परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट आहे. ही परीक्षा लांबणीवर पडणार की नाही यावर आज सर्वोच्च न्यायालयात ३० सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी होणार आहे. कोविड - १९ संसर्ग स्थिती अद्याप आटोक्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा किमान २ ते ३ महिने लांबणीवर टाकावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यावर सुनावणी सुरू आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी झाली होती. यूपीएससीच्या वतीने वकील नरेश कौशिक यांनी बाजू मांडली. परीक्षा स्थगित करण्यास यूपीएससी तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'यापूर्वी एकदा परीक्षा लांबणीवर पडली होती. पुन्हा ती स्थगित केल्याने संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होईल.' दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससीला २९ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36iQXUP
via IFTTT

Post a Comment

0 Comments