विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित

Strike: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांनंतर अखेर गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑक्टोबर २०२० पासून आंदोलन पूर्ववत सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या दहा प्रमुख मागण्यांपैकी चार मागण्या मान्य झाल्या असून अन्य दोन मागण्यांची पूर्तता त्वरित करण्याचे आश्वासन सामंत यांनी संघटनेला दिले आहे. आंदोलनाच्या तात्पुरत्या स्थगितीची घोषणा संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. यात असे नमूद करण्यात आले आहे की 'उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच मंत्रालयातील अनेक, अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे मंत्री महोदयांच्या विनंतीचा मान ठेवून हे आंदोलन तूर्त मागे घेतले जात आहे. मात्र १७ ऑक्टोबर पर्यंत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास १९ ऑक्टोबरपासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडू.' संघटनेच्या काही मागण्या पुढीलप्रमाणे - - महाविद्यालयीन व विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवांतर्गत प्रगती योजना. - सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजनेंतर्गत दहा, वीस, तीन वर्षांच्या सेवेनंतरच्या तीन लाभांची योजना.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ilV9VU
via IFTTT

Post a Comment

0 Comments