Also visit www.atgnews.com
स्टाफ सिलेक्शन कमिशन: SSC CGL परीक्षेचा निकाल जाहीर
Result : कर्मचारी भरती आयोग () ने कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल परीक्षेचा (CGLE) निकाल जाहीर केला आहे. बुधवारी हा निकाल जाहीर झाला. ज्या उमेदवारांनी SSC CGL परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ssc.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकतील. उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध केले जातील. स्टाफ सिलेक्शन कमिशनने CGLE 2018 टीअर - ३ लेखी परीक्षा २९ डिसेंबर २०१९ रोजी घेतली होती. एकूण ५०,२९३ विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र ठरले. त्यापैकी ४१,८०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. टीअर - ३ परीक्षेत किमान पात्रता गुण ३३ आहेत. जे विद्यार्थी पात्र ठरतील ते स्कील टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरतील. टीअर १, टिअर २ आणि टीअर ३ परीक्षांमधील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताणळी आणि कौशल्य परीक्षण अर्थात कॉम्प्युटर प्रावीण्य परीक्षा (CPT) आणि डेटा एन्ट्री स्पीड टेस्टसाठी उपस्थित राहण्यास शॉर्टलिस्ट केले जाईल. SSC CGL Tier 3 Results 2020 'असा' डाऊनलोड करा: - अधिकृत संकेतस्थळा ssc.nic.in वर जा. - होमपेजवर निकालाचे टॅब दिसेल, SSC CGL Tier 3 Results 2020 या पर्यायवर क्लिक करा. - आता पीडीएफ स्वरुपात निकाल दिसेल. - निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा. परीक्षानिहाय निकाल पाहण्यासाठी थेट लिंक पुढीलप्रमाणे आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3inXzU6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments