Also visit www.atgnews.com
खुशखबर! जेईई अॅडव्हान्स्ड हुकली? पुढील वर्षी थेट देता येणार
आयआयटींमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या त्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे, जे कोविड-१९ मुळे यंदा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देऊ शकलेले नाहीत. या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला थेट बसता येणार आहे. जॉइंट एन्ट्रन्स अॅडमिशन बोर्डाने (JAB) हा निर्णय घेतला आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. सध्या एका उमेदवाराला केवळ दोन वेळा आयआयटी एन्ट्रन्स परीक्षा देता येऊ शकते. मात्र, ज्यांना यावर्षी ही परीक्षा देता आली नाही त्यांना सवलत देण्यात येणार आहे. 'सर्वांना समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या उमेदवारांना पुढील वर्षी जेईई मेन क्वालिफाय करण्याची आवश्यकता नसेल. त्यांच्या यंदाच्या जेईई अॅडव्हान्स्डच्या नोंदणीवर त्यांना थेट जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला बसू दिले जाईल,' अशी माहिती आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी दिली. यंदा जेईई मेन आणि अॅडव्हान्स्ड प्रवेश परीक्षेचे आयोजन आयआयटी दिल्लीने केले होते. राव असेही म्हणाले की, 'या उमेदवारांनी पुढील वर्षी जेईई मेन २०२१ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत एकत्रित नव्हे तर अतिरिक्त म्हणून ग्राह्य धरले जाईल.' यंदा जेईई मेन दिल्यानंतर एकूण २ लाख ५० हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी केवळ दीड लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४३ हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड उत्तीर्ण झाले. यात ६,७०७ विद्यार्थिनी होत्या. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत जेईई मेन तर २७ सप्टेंबर रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा झाली. कोविड - १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात आले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2H4L7vq
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments