Also visit www.atgnews.com
दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी
10th and 12th pass Sarkari Bharti 2020: तुम्ही दहावी किंवा बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं असेल, तर भारत सरकारची नोकरी तुमची वाट पाहत आहे. केंद्र सरकारची मिनी रत्न कंपनी नॉर्दन कोल्डफिल्ड्स लिमिटेड (NCL) कोल इंडिया (Coal India) मध्ये विविध पदांवर भरती आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी एनसीएलद्वारे जारी करण्यात आलेलं नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे. कोणत्या पदांच्या किती रिक्त जागा? HEMM मेकॅनिक - १२० पदे मुख्य इलेक्ट्रिशियन - १२० पदे मुख्य वेल्डर - १२० पदे डेटा एन्ट्री ऑपरेटर - १२० पदे एकूण पदे - ४८० पदे अर्जाचा तपशील या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करू अगदी सहजपणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. अर्ज सुरू होण्याची तारीख - १६ ऑक्टोबर २०२० अर्ज करण्याची अंतिम तारीख - १५ नोव्हेंबर २०२० आवश्यक पात्रता HEMM मेकॅनिक आणि मुख्य इलेक्ट्रिशिअनसाठी बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे. मुख्य वेल्डर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर्ससाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांदरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. थेट लिंक्स NCL Apprentice notification 2020 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी NCL च्या वेबसाइट वर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31CT6aI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments