नीट २०२० परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

2020: देणारे लाखो विद्यार्थी ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET 2020 परीक्षेचा निकाल शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. स्वत: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्विट केलं होतं की, 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट यूजी २०२० परीक्षेचा निकाल १६ ऑक्टोबर रोजी जाहीर करेल. उमेदवारांना मी शुभेच्छा देतो.' नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी झाली होती. मात्र, कोविड-१९ संसर्गामुळे किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना १३ सप्टेंबर २०२० रोजी परीक्षा देता आली नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. असा पाहा निकाल - परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात. - सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा. - यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा. - आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा. - नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. - आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2H3lSd3
via IFTTT

Post a Comment

0 Comments