Also visit www.atgnews.com
पाठांतराचेही रेकॉर्ड! आठ वर्षाच्या मुलीने केली घटनेतील कलमे तोंडपाठ
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर तिचं वय अवघे आठ वर्षे, तिचं शिक्षण केवळ तिसरी...पण तिनं जो रॅकॉर्ड केला तो एखाद्या प्रचंड हुशार माणसालाही लाजवेल असाच. कोल्हापुरातील अनुप्रिया या मुलीने एक दोन नव्हे तर तब्बल भारतीय घटनेच्या प्रस्तावनेसह ३५ कलमे आणि त्यामधील उपकलमे देखील पाठ केली आहेत. तिच्या या पाठांतराच्या किमयाची थेट एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अनुप्रिया अमितकुमार गावडे ही आठ वर्षाची मुलगी येथील शांतिनिकेतन शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिरते. तिने भारतीय घटनेच्या प्रस्तावनेसह भाग एक, दोन व तीन मधील ३५ कलमे तोंडपाठ केली आहेत. अनेक मुले खेळात रेकॉर्ड करतात, पण हिने पाठांतरात आगळे वेगळे रेकॉर्ड केले. गेल्या महिन्यात हे तिच्या पाठांतराचे रेकॉर्ड ऑनलाइन करण्यात आले. सहा मिनिटे आणि दहा सेंकदात केलेले हे रेकॉर्डिंग चित्रीकरण करून पाठविण्यात आले. त्याची दखल या पाठांतराच्या किमयेची नोंद थेट एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. तिच्या या यशामध्ये वडिल अमितकुमार, आई प्रा. अक्षता गावडे, डॉ. संजय डी. पाटील, राजश्री काकडे यांचा वाटा आहे. तिच्या या यशाबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते तिचा नुकताच सत्कार करण्यात आला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oLWcD1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments