Also visit www.atgnews.com
'या' राज्यात गेल्या २० वर्षांत केवळ ५ आयएएस!
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देऊन कलेक्टर बनण्याचं स्वप्न अनेक तरुण-तरुणी उराशी बाळगतात.. इंजिनीअरिंग, एमबीए करूनही परीक्षा देऊन होणाऱ्या तरुणांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढते आहे. मात्र देशातलं एक राज्य असं आहे जेथे गेल्या २० वर्षांत केवळ पाच आयएएस अधिकारी तयार झाले आहेत. आता मात्र हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी या राज्याने कंबर कसली आहे. हे राज्य आहे मिझोराम. या राज्यातील सरकारने मंगळवारी एक मोठी घोषणा केली. जे उमेदवार सिव्हिल आणि अन्य केंद्रीय सेवांमध्ये येऊ इच्छितात, त्यांच्या प्रशिक्षणासह संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल, असा निर्णय मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी एका बैठकीत घेतला. राज्य सरकार यूपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी दिल्लीतील प्रतिष्ठित कोचिंग संस्थांसोबत काम करणार आहे. या बैठकीत शिक्षण, रोजगार, उद्योग आणि कौशल्य विकास, योजना आणि वित्त, युवा आयोगासारख्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की गुणवंत उमेदवारांना स्कॉलरशीप दिली जाईल. याशिवाय दिल्लीतील कोचिंग क्लासमध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त सर्व खर्च पूर्ण करण्यासाठी तसेच पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी रोख रक्कम देऊन प्रोत्साहित केले जाईल. स्कॉलरशीपसाठी होईल परीक्षा जे उमेदवार स्कॉलरशीप देण्यास पात्र आहेत, अशांसाठी सरकार एक प्रवेश परीक्षा घेईल. अर्ज करण्यासाठी पात्रता लवकरच जाहीर केली जाईल. अखेरचा आयएएस तामिळनाडूत राज्यातून यूपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत आयएएस होण्याचा मान मिळवणारे लालरिंदीकी पचुआउ हे अखेरचे उमेदवार आहेत. त्यांची पोस्टिंग तामिळनाडूमध्ये झाली आहे. २००० सालानंतर केवळ पाच जण मिझोराममधून आयएएस अधिकारी बनले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2FvoDmZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments