केंद्राच्या गाइडलाइन्सनंतर, 'या' राज्यांमध्ये उघडणार शाळा

केंद्र सरकारने अनलॉक ५ अंतर्गत १५ ऑक्टोबरपासून विविध गोष्टींसाठी नियमावली जारी केली. यानुसार राज्यांना त्यांच्या स्तरावर शाळा उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार पंजाब सरकार येत्या १९ ऑक्टोबर पासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करत आहे. दुसरीकडे मेघालय सरकारनेदेखील शाळा उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. पंजाबमध्ये कंटेन्मेटं झोनच्या बाहेरील शाळा सुरू करण्याबाबत सरकारने गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसओपी देखील जारी केले आहे. पंजाबचे शालेय शिक्षण मंत्री विजय इंदर सिंगला यांनी सांगितले की, 'तपशीलवार गाईडलाइन्स जिल्हा शिक्षण अधिकारी तसेच शाळांच्या ऑथोरिटीजना पाठवण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असेल.' जरी शाळा प्रत्यक्ष सुरू केल्या तरी ऑनलाइन शिक्षणाला नेहमी प्राधान्य दिलं जाईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळांमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक नाही, असेही सिंगला यांनी सांगितले. सध्या पंजाबमधील शाळा दिवसाला केवळ तीन तासांसाठी सुरू केल्या जाणार आहेत. केवळ नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रत्यक्ष सुरू केल्या जात आहेत. कंटेन्मेंट झोनमधील शिक्षक, विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी नसेल. दुसरीकडे, मेघालय सरकारने केंद्र सरकारच्या अनलॉक - ५ च्या गाइडलाइन्सनंतर शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शाळा उघडल्या तरी तूर्त वर्ग भरणार नाहीत. शाळांमध्ये विद्यार्थी-शिक्षक काउन्सेलिंग, इयत्ता सहावी आणि पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असाइनमेंट आणि अन्य सबमिशनचे काम आदीसाठी शाळा उघडल्या जाणार आहेत. यासाठी वेळा कोणत्या असतील, विद्यार्थ्यांनी कधी आणि कशाप्रकारे शाळेत यावे, युनिफॉर्म कोड काय असेल, विद्यार्थी कसे कमीत कमी वेळ शाळेत येतील याबाबतचे नियोजन शाळांवर सोपवण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kaAxly
via IFTTT

Post a Comment

0 Comments