Also visit www.atgnews.com
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'पुणे नॉलेज क्लस्टर'
म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुणे नॉलेज क्लस्टरची स्थापना होणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत; तसेच मशीन लर्निंगसारख्या तंत्रज्ञान शिकता येणार आहे. पुणे नॉलेज क्लस्टरमार्फत विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रम चालविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात पुणे नॉलेज क्लस्टरचे कामकाज विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातून सुरू होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात होण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सर्वप्रथम मटाच्या व्यासपीठावर जानेवारी महिन्यात सांगितले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पुणे नॉलेज क्लस्टर व इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमि अँड ऍस्ट्रॉफिजिक्स (आयुका) यांच्यासोबत सामजंस्य करार केला. या करारानुसार येत्या काळात पुणे नॉलेज क्लस्टर, आयुका व सावित्रीबाई फुले या तीन संस्थांतर्फे महत्वाच्या सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक विषयावरील संशोधनाबरोबरच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या सामंजस्य करारावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयुकाचे संचालक डॉ. सोमक रॉयचौधरी, पुणे नॉलेज क्लस्टरचे प्रिंसिपल इन्व्हेस्टीगेटर प्रा. अजित केंभावी, डॉ. सुरेंद्र घासकड, डॉ. निरंजन अभ्यंकर, डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, डॉ. दीपक माने, डॉ. महेश काकडे, डॉ. सुरेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात आरोग्य केंद्राजवळ नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पुणे नॉलेज क्लस्टरचे प्रमुख कार्यालय राहणार आहे. या निर्माणाधिन कार्यालयात फर्निचर आजी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. पुणे नॉलेज क्लस्टरचा उद्देश शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योगजगाताची सांगड घालून विविध समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी पुण्यामध्ये पुणे नॉलेज क्लस्टरची स्थापना करण्यात आली आहे. देशातील अंतिम मान्यता मिळालेले हे पहिलेच क्लस्टर आहे. पर्यावरण, आरोग्य, इलेक्ट्रिक वाहने, बिग डेटा व आर्टिफिशियल इंटलिजन्स या क्षेत्रांसाठी प्रामुख्याने हे क्लस्टर काम करेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3m1Cxg8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments