Also visit www.atgnews.com
नीट यूजी समुपदेशनाच्या पहिली फेरीला सुरुवात
Counselling 2020: नीट यूजी समुपदेशनाची पहिली फेरी अखेर आजपासून सुरू झाली. मेडिकल काउन्सेलिंग कमिटी (MCC) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर बुधवार २८ ऑक्टोबरपासून नीट यूजी काऊन्सेलिंग २०२० साठी नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली. ही प्रक्रिया मंगळवार २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार होती, मात्र काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया एक दिवस लांबणीवर टाकण्यात आलेली होती. इच्छुक उमेदवार या एमसीसीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतात. नोंदणी करण्याची अखेरची मुदत २ नोव्हेंबर २०२० आहे. पसंतीक्रम, शुल्क देखील २ नोव्हेंबर २०२० पर्यंत भरायचे आहेत. जागा अलॉट होण्याची प्रक्रिया ३ आणि ४ नोव्हेंबर या दोन दिवशी सुरू राहील. पहिल्या फेरीचा जागावाटपाचा निकाल ५ नोव्हेंबर रोजी लागेल. ज्या विद्यार्थ्यांना जागा अलॉट होतील त्यांनी त्या महाविद्यालयात ६ ते १२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत प्रवेश निश्चितीसाठी रिपोर्ट करायचे आहे. कशी करायची नोंदणी? - नीट ऑल इंडिया काउन्सेलिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी mcc.nic.in वर रजिस्टर करावे लागेल. - एमसीसीच्या संकेतस्थळावर जा. - होम पेजवर डावीकडे न्यू रजिस्ट्रेशन लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. - यात विचारलेली सर्व माहिती भरून रजिस्टर करा. - रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक आयडी मिळेल. - पुढील सर्व प्रक्रियेसाठी हा आयडी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे तो सुरक्षितपणे नोंदवून ठेवा प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे - १) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड २) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत ३) जन्मतारखेचा दाखला ४) बारावीचे प्रमाणपत्र ५) बारावीची गुणपत्रिका ६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे) ७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर ८) ओळखपत्र या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kC7Zl2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments