जेईई अॅडव्हान्स्ड: 'त्या' विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच

JEE Advanced 2020: जे विद्यार्थी कोविड-१९ संक्रमित असल्याने परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी पुनर्परीक्षा आयोजिन न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र या निर्णयात हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. परिणामी या विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्या. जयंतनाथ यांनी सांगितले की शैक्षणिक प्रकरणातील निर्णय तज्ज्ञांवर सोपवणे न्यायालयांसाठी अधिक योग्य आणि सुरक्षित असते कारण न्यायालयापेक्षा त्या समस्यांची त्यांना अधिक जाण असते. एका विद्यार्थ्याने दाखल केलेली ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. या विद्यार्थ्याने यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या जेईई मेन्स परीक्षा यशस्वीपणे दिली आणि अॅडव््हान्स्डसाठी तो पात्र ठरला. मात्र २७ सप्टेंबर रोजी झालेल्या जेईई अॅडव्हान्स्ड परीईक्षेला तो बसू शकला नाही. त्याला २२ सप्टेंबर रोजी कोविड-१९ ची बाधा झाली होती. परिणामी त्याला परीक्षेला मुकावे लागले. या परीक्षेचा निकाल ५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. या विद्यार्थ्यानी आयआयटी दिल्लीच्या अध्यक्षांना पत्र लिहून आपली परिस्थिती सांगितली आणि ही परीक्षा अन्य कुठला दिवशी घेण्याची विनंती केली. त्याने जयपूर येथील परीक्षा केंद्राशी देखील संपर्स साधला होता. पण कोविड संक्रमित विद्यार्थ्यांना बसण्यासाठी परीक्षा केंद्रावर विशेष व्यवस्था नव्हती. या विद्यार्थ्यांनी न्यायालयाला सांगितले की 'एका विद्यार्थ्याला दोन वर्षात केवळ दोन वेळा ही परीक्षा देता येते. यापैकी एक संधी मी गमावली आहे.' तूर्त तरी ज्या विद्यार्थ्यांची यंदा हुकली आहे, त्यांनी पुढील वर्षी थेट अॅडव्हान्स्ड परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र यंदा या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार नसल्याचे आयआयटी दिल्लीने स्पष्ट केले आहे. हेही वाचा :


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35DK5iU
via IFTTT

Post a Comment

0 Comments