Also visit www.atgnews.com
दहावी-बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
SSC HSC Re-Exam TimeTable 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा / फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा २० नोव्हेंबर २०२० पासून सुरू होत आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा ११ नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत. लेखी परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - इयत्ता -- कालावधी दहावी - २० नोव्हेंबर २०२० ते ५ डिसेंबर २०२० बारावी (सर्वसाधारण आणि दि्वलक्षी) - २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२० बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) - २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२० प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर २०२० ते ५ डिसेंबर २०२० या कालावधीत घेतल्या जातील. इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर २०२० ते १० डिसेंबर २०२० या कालावधीत आयोजित केल्या जातील. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेच्या वेळी त्यांच्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडे विभागीय मंडळामार्फत आलेले छापील स्वरुपातील वेळापत्रक अंतिम असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन देखील मंडळाने केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना या फेरपरीक्षेला बसायचे आहे, ते विद्यार्थी बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्याच्या तारखा राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहेत. फेरपरीक्षा किंवा पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - नियमित शुल्कासह अर्ज करणे - २० ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२० विलंब शुल्कासह अर्ज करणे - ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत ते किंवा ज्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण असूनही श्रेणी सुधारायची आहे, असे सर्व विद्यार्थी ही पुरवणी परीक्षा देऊ शकतील. श्रेणीसुधारसाठी नोव्हेंबर-डिसेंबर २०२० आणि फेब्रुवारी-मार्च २०२१ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Hgn517
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments