CBSE: नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाचा मोठा दिलासा; वाचा सविस्तर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात बोर्डाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीबीएसई बोर्डाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ .nic.in वर हे परिपत्रक आहे. बोर्डाने दोन वेगवेगळ्या सूचना जारी केल्या आहेत. एक इयत्ता नववी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दुसरी सूचना इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दोन्ही सूचनांच्या लिंक पुढे देत आहोत. इयत्ता नववी आणि अकरावीसाठी बोर्डाने इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणीची मुदत वाढवली आहे. ही नोंदणी २०२२ साली होणाऱ्या परीक्षेसाठी आहे. आधी दोन्ही इयत्तांसाठी रजिस्ट्रेशनची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर २०२० होती. आता दोन्ही इयत्तांसाठी विलंब शुल्काशिवाय नोंदणीची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर २०२० करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क भरावे लागेल. विलंब शुल्कासह नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ नोव्हेंबर २०२० आहे. प्रति विद्यार्थी दोन हजार रुपये विलंब शुल्क आहे. यासंदर्भातील सीबीएसईचे परिपत्रक वाचण्यासाठी इयत्ता दहावी, बारावीसाठी सध्या जे विद्यार्थी दहावी, बारावीत शिकत आहेत, ते २०२१ मधील बोर्ड परीक्षा देतील. या परीक्षेसाठी शाळा सीबीएसईला विद्यार्थ्यांची यादी पाठवतात. या यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे असतात, त्यांना बोर्डाची परीक्षा देण्याची संधी मिळते. कारण बोर्ड या यादीनुसारच परीक्षांची पूर्ण तयारी करते. विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून या यादीत नाव नोंदवायचे असते. नंतर शाळा ही यादी बोर्डाला पाठवतात. सीबीएसईकडे यादी पाठवण्यासाठी शाळांकडे अंतिम मुदत १५ ऑक्टोबर होती. ती वाढवून आतात ३० ऑक्टोबर २०२० करण्यात आली आहे. तर विलंब शुल्कासह ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत शाळा ही यादी पाठवू शकते. विलंब शुल्काशिवाय प्रति विद्यार्थी पाच मुख्य विषयांसाठी १५०० रुपये आकारले जातील. प्रत्येक अतिरिक्त विषयासाठी ३०० रुपये शुल्क असेल. मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी ३५० रुपये आकारले जातील तर विलंब शुल्क प्रति विद्यार्थी २,००० रुपये आहे. यासंबंधी बोर्डाने जारी केलेले परिपत्रक वाचण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SWlfoj
via IFTTT

Post a Comment

0 Comments