स्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL 2019 परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी

कर्मचारी भरती आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कम्बाइंड हायर सेकंडरी लेव्हल (CHSL) पदांच्या भरतीसाठी १२ ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा परीक्षेचे आयोजन होत आहे. कोविड-१९ विषाणू महामारी स्थितीमुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. CHSL 2019 आता १२ ऑक्टोबरपासून पुन्हा आयोजित केली जात आहे. उर्वरित उमेदवारांसाठी नवे अॅडमिट कार्ड स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अनेक क्षेत्रांद्वारे जारी करण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपल्या संबंधित झोनमध्ये लॉगइन करून आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्यावे असे आवाहन आयोगाने केले आहे. ज्यांना सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असतील, त्यांना देखील परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याचा निर्णय स्टाफ सिलेक्शन कमिशनने घेतला आहे. अशा उमेदवारांची स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. CHSL 2019 डाऊनलोड करण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे आहेत - कधीपासून कधीपर्यंत परीक्षा? SSC CHSL 2019 परीक्षा १२ ते १६ ऑक्टोबर आणि १९ ते २१ ऑक्टोबर तसेच २६ आक्टोबर या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पुढील परीक्षेत बसण्याची संधी मिळेल. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पुढील परीक्षा कधी? २७ ते ३० ऑक्टोबर पर्यंत ज्युनिअर इंजिनीअर पदांसाठी परीक्षा आयोजित करणार आहे. SSC CGL परीक्षा २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत आयोजित केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lpXlh6
via IFTTT

Post a Comment

0 Comments