Also visit www.atgnews.com
GATE 2021: विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ
Update:आयआयटी मुंबईने गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ही परीक्षा देण्यास इच्छुक असलेले उमेदवार आता विलंब शुल्कासह १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतील. गेटचे अधिकृत संकेतस्थळ gate.iitb.ac.in वर विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. यापूर्वी विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२० होती. अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, 'GATE 2021 साठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत बुधवार १४ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.' परीक्षा कधी होणार? GATE 2021 परीक्षा ५,६,७,१२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. GATE 2021 साठी अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ पासून उपलब्ध होती. GATE 2021 परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा? - नोंदणी आपलं नाव, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरून GOAPS पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करा. एक पासवर्ड तयार करा. -अर्ज भरा सर्व महत्त्वाची, आवश्यक माहिती भरा आणि आपल्या सोयी आणि पसंतीनुसार गेट २०२१ पेपर आणि परीक्षा केंद्राची निवड करा. - छायाचित्र अपलोड करा आपलं छायाचित्रं स्कॅन अपलोड करा. स्वाक्षरी आणि कॅटेगरी सर्टिफिकेटही अपलोड करा. - शुल्क नेट बँकिंग किंवा डेबिट / क्रेडिट कार्डाद्वारे अर्जाचे शुल्क भरा. - अर्ज सादर करा सर्व माहिती एकदा नीट तपासून घ्या आणि अॅप्लिकेशन फॉर्म सबमिट करा. GATE 2021 परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया संपल्यावर उमेदवार एकदा आपला अर्ज एडिटही करू शकणार आहे. या दुरुस्तीसाठी २८ ऑक्टोबर रोजी आयआयटी मुंबई गेट पोर्टल उघडणार आहे. GATE 2021 साठी अर्ज केलेले उमेदवार GOAPS ऑनलाइन नोंदणी पोर्टलद्वारे gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर अर्ज एडिट करू शकतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dkTBe2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments