JoSAA Counselling दुसऱ्या फेरीचा अलॉटमेंट निकाल जारी

(JoSAA Counselling) ने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या फेरीचा अलॉटमेंट निकाल जारी केला. ही यादी वर उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी JoSAA समुपदेशनासाठी अर्ज केला होता त्या विद्यार्थ्यांनी वरील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दुसऱ्या फेरीचा निकाल पाहावा. पहिल्या फेरीत अलॉट झालेल्या जागा, दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा आधी सर्व माहिती येथे मिळेल. या यादीनंतर ऑनलाइन रिपोर्टिंग, शुल्क भरणे आदि प्रक्रिया २३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हरकती नोंदवण्यासाठी २४ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत आहे. यंदा JoSAA च्या एकूण सहा समुपदेशन फेऱ्या होणार आहेत. दरवर्षी त्या सात असतात मात्र यंदा कोविड-१९ महामारी स्थितीमुळे एक फेरी कमी करण्यात आली आहे. JoSAA पहिल्या फेरीचा निकाल १७ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होती. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ११० संस्थांमधील अभ्यासक्रमांसाठी हे प्रवेश होत आहेत. या ११० संस्थांमध्ये २३ IIT, ३१ NIT, २६ IIIT, IEST शिवपूर आणि २९ अन्य शासकीय अनुदानित तंत्र संस्थांचा समावेश आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3joiYwW
via IFTTT

Post a Comment

0 Comments