Also visit www.atgnews.com
SBI क्लर्क भरती: पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
SBI Clerk Prelims Exam Result 2020 declared: भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ने क्लर्क भरती पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल उमेदवारांना पाहता येणार आहे. कोविड -१९ संक्रमणस्थितीमुळे निकाल विलंबाने जाहीर झाला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते आपला निकाल www.sbi.co.in या संकेतस्थळावर पाहू शकतील. SBI ज्युनियर असोसिएट्स पूर्व परीक्षा २२, २९ फेब्रुवारी आणि १ तसेज ८ मार्च २०२० या दिवशी झाली होती. आता SBI ज्युनियर असोसिएट्स मुख्य परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. जे उमेदवार पू्र्व परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत ते SBI Clerk Main Exam 2020 साठी पात्र आहेत. SBI Clerk Prelims Exam Result 2020 च्या थेट लिंकवर जाण्यासाठी SBI ज्युनिअर असोसिएट्स (क्लर्क) च्या एकूण ७,८७० पदांसाठी ही भरती होत आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना १३,०७५ रुपये दरमहा असे सुरुवातीचे वेतन असणार आहे. एसबीआय क्लर्क मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा असेल? १) सामान्य इंग्रजी - ४० प्रश्न - ४० गुण - ३५ मिनिटे कालावधीची परीक्षा २) क्वान्टिटेटिव्ह अॅप्टिट्यूड - ५० प्रश्न - ५० गुण - ४५ मिनिटे कालावधीची परीक्षा ३) रिझनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड - ५० प्रश्न - ६० गुण - ४५ मिनिटे कालावधीची परीक्षा ४) जनरल / फायनान्शिअर अवेअरनेस - ५० प्रश्न - ४० गुण - ३५ मिनिटे कालावधीची परीक्षा एकूण १९० प्रश्न - २०० गुण - २ तास ४० मिनिटे कालावधीची परीक्षा मुख्य परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी SBI क्लर्क पूर्व परीक्षेच्या निकालासह मुख्य परीक्षा २०२० चे अॅडमिट कार्डही भारतीय स्टेट बँकेने जारी केले आहे. पूर्व परीक्षेत यशस्वी होणारे उमेदवार आता एसबीआय क्लर्क मेन्सचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील. परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. एसबीआय क्लर्क मुख्य परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3m6UyK5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments