तृतीय वर्ष बीए , बीएस्सी व बीएमएस परीक्षेचा निकाल जाहीर

Results 2020: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/ सत्राच्या नियमित परीक्षेतील तृतीय वर्ष बीए, बीएस्सी व बीएमएस सत्र ६ या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आजपर्यंत विद्यापीठाने ८७ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.आज विद्यापीठाने १३ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९४.७० टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार ७८२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १३ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १३ हजार ५३७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. तर १०० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ५४७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.८५ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ८ हजार ०२५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १० हजार ५२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १० हजार ४४७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ७६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच १७६ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.५८ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १३ हजार १६६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ हजार ७०७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ४४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ३२७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा विभागातील निकाल कक्ष व सीसीएफ मधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग निकाल जाहीर करण्यासाठी कार्यरत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mNDl8K
via IFTTT

Post a Comment

0 Comments