Also visit www.atgnews.com
इग्नूतर्फे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
Notification: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University)तर्फे पदवी आणि पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना टर्म एंड परीक्षेत बसण्यापासून सवलत देण्यात आली आहे. जुलै २०२० च्या प्रवेश सत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत मिळालेल्या सरासरी गुण/ग्रेड्सच्या आधारावर प्रमोट केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल एक्झाम, असाइनमेंट, प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रबंध, इंटर्नशिप, फील्डवर्क जर्नल्स (प्रॅक्टिकम्स) सारख्या इतर असाइनमेंटमधून सूट दिली जाणार नाही हे लक्षात ठेवायला हवे. जुलै २०२० च्या प्रवेश सत्रामध्ये आणि जानेवारी २०२१ च्या बीएससी पदवीच्या तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरसाठी डिसेंबर २०२१ मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी परीक्षेच्या दुसऱ्या वर्षासाठी परीक्षेचे आयोजन इग्नूतर्फे केले जात आहे. डिसेंबर टीईई २०२१ साठी असाइनमेंट जमा करण्याला मुदतवाढ इंदिरा गांधी नेशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University)ने डिसेंबर टीईई २०२१ असाइनमेंट (IGNOU December TEE 2021 Assignment)जमा करण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत असाइनमेंट जमा करता येणार आहे. डिसेंबर २०२१ ला टर्म एंड परीक्षेसाठी उपस्थित राहणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर अधिक माहिती मिळवू शकतात. याआधी असाइनमेंट जमा करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत होती. युनिव्हर्सिटी ने डिसेंबर २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ही परीक्षा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आणि २२ फेब्रुवारी २०२२ रोजी संपेल. डिसेंबर २०२१ टर्म-एंड परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म ऑनलाइन जमा करण्यासाठी पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/319VXu9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments