Also visit www.atgnews.com
१ डिसेंबरपासून सुरू होणार इंजिनीअरिंगचे वर्ग
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन () ची मान्यता असलेल्या संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेचा आजचा अखेरचा दिवस आहे. इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे नवे सत्र मंगळवार १ डिसेंबर २०२० पासून सुरू होत आहे. एआयसीटीईच्या वेळापत्रकानुसार, सेकंड इयर डायरेक्ट इंजिनीअरिंग प्रवेशांचा देखल सोमवार ३० नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता. इंजिनीअरिंगसह, डिप्लोमा, फार्मसी, आर्किटेक्चर आणि परिषदेच्या अखत्यारीतील इतर अभ्यासक्रमांसाठीही हेच वेळापत्रक लागू राहील, असे एआयसीटीईने स्पष्ट केले होते. 'देशातील करोना स्थितीमुळे अनेक राज्य सरकारांनी आणि आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती,' असं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, इंजीनिअरिंगचे वर्ग ऑनलाइन, ऑफलाइन किंवा दोन्ही संमिश्र प्रकारे घेता येईल. त्यासाठी एआयसीटीईने SOP देखील जारी केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेजे बंद आहेत. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर झाला आहे. याबाबत परिषदेने १ नोव्हेंबरपासून प्रथम वर्ष इंजिनीअरिंगचे वर्ग सुरू करण्यातबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, अनेक राज्यांच्या प्रवेशपरीक्षा पार पडलेल्या नव्हत्या. तसेच ज्यांच्या प्रवेशपरीक्षा झाल्या आहेत, त्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नव्हते. यामुळे प्रवेशप्रक्रिया खोळंबल्या होत्या. परिणामी १ नोव्हेंबरपासून प्रथम वर्षाचे वर्ग सुरू होणे अवघड आहे. परिणामी हे वर्ग आता १ डिसेंबरपासून सुरू करावेत, असे आदेश परिषदेने दिले होते. सर्व इंजिनीअरिंग कॉलेजे, तसेच आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेश ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qfj92o
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments