UGC NET 2020 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर

2020 final answer key: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) (UGC NET) परीक्षेची अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) जारी केली आहे. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर nta.ac.in वर ही आन्सर की जारी करण्यात आली आहे. यूजीसी नेट ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा २४ सप्टेंबर २०२० ते १३ नोव्हेंबर २०२० दरम्यान घेण्यात आली होती. देशभरातून एकूण ८ लाख ६० हजार ९७६ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ ५ लाख २६ हजार ७०७ उमेदवारच परीक्षेला बसले. विविध ८१ विषयांमध्ये ही संगणकीकृत परीक्षा झाली होती. एनटीएनेही यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की प्रोव्हिजनल आन्सर की वर नोंदवलेल्या सर्व हरकतींचे परीक्षण करून त्यांचे निराकरण करून ही अंतिम उत्तर-तालिका तयार केली गेली आहे. याच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे. थेट लिंकद्वारे यूजीसी नेट २०२० अंतिम उत्तरतालिका पाहण्यासाठी यूजीसी नेट २०२० चा निकाल एनटीएकडून लवकरच जाहीर केला जाईल. हा निकाल एनटीए आणि यूजीसी नेटची अधिकृच वेबसाइट nta.ac.in आणि ugcnet.nta.nic.in वर जाहीर केला जाईल. यूजीसी नेटच्या वेबसाइटवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39rbGXT
via IFTTT

Post a Comment

0 Comments