पुणे विद्यापीठाची अंतिम वर्ष फेरपरीक्षा ५ नोव्हेंबरपासून

2020: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाइन फेरपरीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. तांत्रिक कारणांमुळे नियमित परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत होईल. या वेळापत्रकानुसार ५ नोव्हेंबरला शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुकला, मानसनीती आणि समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण या अभ्यासक्रमांची, ६ नोव्हेंबरला वाणिज्य, व्यवस्थापन व विधी अभ्यासक्रम, तर ७ नोव्हेंबरला कला आणि विज्ञान अभ्यासक्रमांची परीक्षा होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली. अंतिम वर्षातील नियमित, पुनर्रपरीक्षार्थी, बहि:स्थ अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा १२ ऑक्‍टोबरपासून घेण्यात आली. तांत्रिक आणि अन्य कारणांसाठी परीक्षेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागलेल्या विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म भरून घेण्यात आला होता. यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही फेरपरीक्षा देता येणार आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाइन फेरपरीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक पाहण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2I6chmu
via IFTTT

Post a Comment

0 Comments