परदेश शिष्यवृत्तीसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत यापूर्वी अर्ज करण्यासाठी १८ जून २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, जगभरात करोना संसर्गाचे निर्बंध असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत 'ऑफर लेटर' प्राप्त झाले नाही. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार मुंडे यांनी विभागाला आदेश देऊन ही मुदत ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्याच्या सूचना दिली होती. त्यानुसार विभागाकडून ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 'या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी अद्ययावत क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये ३०० च्या आत क्रमांक मिळवणाऱ्या परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे,' अशी माहिती समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया अर्जासाठी वेबसाइट : www.maharashtra.gov.in यावरील रोजगाराच्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करावा. अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल swfs.applications.२१२२@gmail.com हार्डकॉपी पाठवण्यासाठी पत्ता : समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3w2GqpH
via IFTTT

Post a Comment

0 Comments