यूजीसी नेट परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की २०२० जारी

NET Provisional Answer Key 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की २०२० जारी केली आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या संकेतस्थळावर ही गुरुवारी जारी करण्यात आली. ज्या उमेदवारांनी एनटीए यूजीसी नेट २०२० परीक्षा दिली आहे त्यांनी अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन उत्तरतालिका पाहावी. ही उत्तरतालिका पाहता येईल आणि डाऊनलोड देखील करता येईल. सोबतच एनटीएने या उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवण्याची लिंकही सक्रीय केली आहे. ही लिंक ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत अॅक्टिव्ह असणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक तसेच उत्तरतालिकेची लिंकही देण्यात येत आहे. २४ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत NET च्या ५५ विषयांच्या परीक्षा झाल्या. या सर्व प्रश्नपत्रिकांच्या तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर करण्यात आल्या आहेत. UGC NET 2020 Answer Key कशी डाऊनलोड करायची? पुढील पद्धतीने UGC NET 2020 Answer Key डाऊनलोड करता येईल - - यूजीसी नेटचे अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जावे - होमपेजवर 'View Question Paper/ Answer Key Challenge' या पर्यायावर क्लिक करावे. - तुमचा UGC-NET अॅप्लिकेशन नं., जन्मतारीख, सिक्युरिटी पिन टाकावी. - लॉगइन केल्यावर view / download या पर्यायवर क्लिक करत हव्या त्या ऑपशनवर जावे. येथे उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका असे अनेक पर्याय असतील. - उत्तरतालिकेबाबत काही हरकत असेल तर तीही नोंदवावी. त्यासाठीची लिंकही देण्यात आलेली आहे. UGC NET 2020 उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38gh27P
via IFTTT

Post a Comment

0 Comments