Also visit www.atgnews.com
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले परभणीच्या विद्यार्थ्याला पत्र!
यांचा दिनक्रम अत्यंत व्यग्र असतो, मात्र खूप कमी लोकांना हे माहित आहे की त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या वेळ काढून लोकांच्या पत्रांना उत्तर देतात. शालेय विद्यार्थ्यांमध्येदेखील ते लोकप्रिय आहेत. मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नेहमी विद्यार्थ्यांशी परीक्षा, अभ्यास, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी विषयांवर संवाद साधतात. पंतप्रधान मोदींचे एक पत्र महाराष्ट्रातील परभणी येथील सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय जितेंद्र डाके या विद्यार्थ्याला मिळाले आहे. खरे तर अजयने पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिले होते आणि त्याबरोबर त्यांचे एक रेखाचित्र बनवून पाठवले होते. या पत्राच्या उत्तरात पंतप्रधानांनी अजयला लिहिले, ‘वास्तविक चित्रकला एक अशी शैली आहे जी स्वप्नांना कॅनव्हॉसवर आकार देते. या शैलीचे सामर्थ्य अद्भुत आहे.' अजयचे मनोबल वाढवताना पंतप्रधानांनी पत्रात पुढे लिहिले आहे, ‘तुझ्या कलाकृतीबरोबरच, पत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावना, तुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करते. पंतप्रधानांनी अजयला सल्ला दिला कि तो त्याच्या या कलेचा वापर आपण समाजात जागरूकता आणण्यासाठी करू शकतो. त्यांनी पत्रात लिहिले आहे, ‘तू तुझ्या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक विषयांसंदर्भात सजग करण्याचा प्रयत्न करशील अशी मी आशा करतो.’ पत्रात मोदींनी अजयला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. तत्पूर्वी अजयने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांगितले होते कि त्याला चित्र काढायला खूप आवडते. अजयने लिहिले होते कि त्याचे चित्रकलेचे एक वेगळेच विश्व आहे आणि चित्रकलेच्या माध्यमातून तो आपले विचार प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो. भविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करायची इच्छा असल्याचे अजयने पत्रात लिहिले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33k9opN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments