अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात जैन अध्यासनाची स्थापना

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात जैन अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे. तीन भारतीय-अमेरिकन दाम्पत्यांकडून विद्यापीठाला यासाठी दहा लाख डॉलर्सची देमगी मिळाली आहे. भगवान विमलनाथ एंडाउड चेअर इन जैन स्टडीज युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सांता बार्बारामध्ये जैन धर्मावर पदवी अभ्यासक्रम विकसित केला जाणार आहे आणि नंतर तो विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे की जैन धर्माचे सिद्धांत अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकतावाद याविषयी विद्यापीठात शिकवले जाईल तसेच आधुनिक समाजात या सिद्धांतांनुसार वागण्याकडे ध्यान दिले जाईल. डॉ. मीरा आणि डॉ. जसवंत मोदी यांनी वर्धमान चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे ही देणगी दिली. रीता आणि डॉ. नरेंद्र पारसन यांनी नरेंद्र अँड रीता पारसन फॅमिली ट्रस्ट आणि रक्षा आणि हर्षद शाह यांनी शाह फॅमिली फाउंडेशन द्वारे देणगी दिली आहे. तिन्ही दाम्पत्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे म्हटले आहे की, 'मानवजात आणि सर्व रुपांतील जीवनाला मदत करण्यासाठी तसेच जलवायू परिवर्तनाच्या समस्येवर प्रभावी उपाय अहिंसेच्या सिद्धांताला चालना देणे आणि सर्व मतांच्या लोकांप्रति सन्मान दर्शवणे हा आहे. जैन अध्यासनासाठी एका पीठाचं सनर्थन करणं आणि त्याची स्थापना करून या उद्दिष्याकडे वाटचाल करणं सर्वाधिक चांगली पद्धत आहे.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pYnpmv
via IFTTT

Post a Comment

0 Comments