Also visit www.atgnews.com
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात रेल्वे प्रवासाची मुभा
SSC, HSC ReExams 2020: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेसाठी वैध हॉलतिकीट दाखवून विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करता येणार आहे. याशिवाय शिक्षक-शिक्षकेतरांनाही वैध ओळखपत्रासह लोकल प्रवास करता येईल. ही सवलत १० डिसेंबरपर्यंत मिळणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. हावी व बारावीची फेरपरीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. मात्र विद्यार्थ्यांना लोकलप्रवासाची मुभा नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परीक्षा काळात या विद्यार्थ्यांना तत्काळ उपनगरीय रेल्वेसेवेत प्राधान्याने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मनसेने रेल्वे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुंबई व उपनगरात शाळेत शिकवणारे शिक्षक, शिक्षिका व अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. अनेक विद्यार्थ्यांनी उपनगरातून मुंबईत महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याने त्याच कॉलेजांच्या अनुषंगाने परीक्षा केंद्र आलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना लांब अंतरावरून यावे लागते. त्यासाठी बहुतांश विद्यार्थी रेल्वेनेच प्रवास करत असतात. आता करोनामुळे रेल्वेसेवा सामान्य नागरिकांना बंद आहे. याच काळात आता दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याकरीता रेल्वेशिवाय अन्य पर्याय नाही. तरी अशा विद्यार्थ्यांना व पालकांना लोकलमधून प्रवास करण्याकरीता परिक्षा कालावधीत विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी. उपनगरीय रेल्वे तिकिटांकरीता असलेल्या रांगेचा विचार करता या मुलांना खास बाब म्हणून त्यांच्या हॉल तिकिटावर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे चेतन पेडणेकर यांनी सरकारकडे तसेच मध्य व पश्चिम रेल्वेकडे केली होती. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा रेल्वेने यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केले. वैध ओळखपत्र, हॉलतिकीट असणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रेल्वे प्रवास करताना हॉलतिकीट सोबत बाळगावे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lSNBwr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments