आयबीपीएस क्लर्क मुख्य परीक्षेची तारीख बदलली; पाहा वेळापत्रक

Clerk Main Exam: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने मंगळवारी काही परीक्षांचे वेळापत्रक जारी केले. त्यानुसार IBPS क्लर्क मुख्य परीक्षा जानेवारीऐवजी फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहे. आधी ही परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये होणार होती. मात्र आता ही परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. जे उमेदवार आयबीपीएस क्लर्क पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना मुख्य परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर हे तात्परते शेड्युल उमेदवारांना पाहता येईल. ibps.in हा संकेतस्थळाचा पत्ता आहे. आयबीपीएस सीआरपी मुख्य परीक्षांचे वेळापत्रक यावर जारी करण्यात आलं आहे. RRB (ऑफिसर स्केल १ आणि ऑफिस असिस्टंट्स मल्टीपर्पज), पीओ / एमटी (ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनीज) आणि क्लर्क मेन परीक्षांच्या तारखा आयबीपीएसने जारी केल्या आहेत. मात्र क्लर्क पूर्व परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. या वेळापत्रकानुसार, IBPS RRB परीक्षा ३० जानेवारी २०२१ रोजी तर ऑफिस अस्टिस्टंट्स परीक्षा २० फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर्स / मॅनेजमेंट ट्रेनीज मुख्य परीक्षा ४ फेब्रुवारी २०२१ रोजी तर आयबीपीएस क्लर्क मुख्य परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या थेट लिंकवरूनदेखील उमेदवार परीक्षांचे वेळापत्रक पाहू शकतील. उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी अद्ययावत माहितीसाठी नियमितपणे IBPS चे संकेतस्थळ पाहावे. IBPS RRB/Clerk/PO/MT मुख्य परीक्षांचे वेळापत्रक पाहण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eoTkY5
via IFTTT

Post a Comment

0 Comments