सीए परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नाही; ICAI ने कोर्टाला सांगितलं

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की आगामी CA परीक्षा ऑनलाइन घेणं शक्य नाही. काही विद्यार्थ्यांनी कोविड - १९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी केली होती. या तीन तास कालावधीच्या परीक्षेचे पॅटर्न विश्लेषणात्मक आहे, ही परीक्षा बहुपर्यायी प्रकारची असू शकत नाही, असं संस्थेने कोर्टाला सांगितलं. न्या. ए.एम. खानविलकर, न्या. दिशेन माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. आयसीएआयला आपल्या संकेतस्थळावर कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती द्यावी असे निर्देश न्यायालयाने दिले आणि परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विस्तृत स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची मागमी करणारी याचिका निकाली काढली. परीक्षा देण्यास जाणाऱ्या उमेदवारांसाठी वाहतुकीची, राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी देखील याचिकाकर्त्यांनी केली होती. यावर खंडपीठाने सांगितलं की हा राज्यनिहाय मुद्दा आहे. मागील काही परीक्षांच्या काळात राज्यांनी अशी व्यवस्था केली होती. मात्र सीए सारख्या व्यावसायिक परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी स्वत:ला स्थितीनुसार परीक्षा देण्यासाठी तयार करायला हवं आणि अशाप्रकारे सवलती मागायला नकोत, असं मतही न्यायालयाने नोंदवलं. परीक्षा कधी? २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२० या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा मे २०२० मध्ये होणार होती. मात्र करोना महामारी स्थितीमुळे ती लांबणीवर टाकण्यात आली होती. अॅडमिट कार्ड जारी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आपले अधिकृत संकेतस्थळ icaiexam.icai.org वर जारी केले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TRSwS7
via IFTTT

Post a Comment

0 Comments