CAT 2020: दोन लाखांवर विद्यार्थी देणार कॅट; तीन सत्रांत परीक्षा

2020: देशातील मॅनेजमेंटचे शिक्षण देणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) संस्थांमधील MBA/PGDM या व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात परीक्षा रविवारी २९ नोव्हेंबर २०२० रोजी होत आहे. सकाळी ८.३० ते १०.३० आणि दुपारी १२.३० ते २.३० तर त्यानंतर सायंकाळी ४.३० ते ६.३० अशा तीन सत्रात ही परीक्षा होणार आहे. देशभरात १५९ शहरांमध्ये एकूण ४३० परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण सुमारे २ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ऐन कोविड -१९ विषाणू महामारी काळात परीक्षा होत आहे.. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९६.१५ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षेला जाताना पुढील सूचनांकडे द्या लक्ष - - उमेदवारांनी अॅडमिट कार्डवर दिलेल्या वेळेतच त्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचावे. - कॅट परीक्षा दोन तास कालावधीची आहे. - पुढील विभागवार असतील प्रश्न १) व्हर्बल अॅबिलिटी अँड रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, २) क्वान्टिटेटिव्ह अॅबिलिटी, ३) डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिझनिंग - उमेदवारांनी प्रत्येक विभागातील प्रश्नांसाठी ४० मिनिटांचा अवधी असेल. दिव्यांगांसाठी १३ मिनिटे २० सेकंद इतका अतिरिक्त अवधी प्रत्येक विभागासाठी असेल. - उमेदवारांनी परीक्षेला जाताना कॅट अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून सोबत बाळगणे अनिवार्य आहे. - ओळखपत्र, दोन साधे पेन आणि मास्क, सॅनिटायझर सोबत न्यावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37kcv2h
via IFTTT

Post a Comment

0 Comments