Also visit www.atgnews.com
MHT CET Result 2020: एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशीरा जाही केला. यात पीसीबी गटात १९ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण तर पीसीएम गटात २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. १०० पर्सेंटाइल गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पीसीएम गटात पुण्याची सानिका गुमास्ते, शुभम जोग तर मुंबईतून केतकी देशमुख, चैतन्य व्होरा, सोहम चिटणीस, निष्ठा पांडे, आर्यमन शार्दुल, रिशभ बाली, पार्थ गुजराती आण ठाण्यातून पवन कुंटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पीसीबी गटात पुण्याचा अनिष जगदाळे, पालघरची वर्षा खुशवाह, मुंबईतील तनय मांजरेकर, देवेश शाह, जयेश चौधरी, परिता गाडा या विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा १ ते २० ऑक्टोबर दरम्यान झाली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा राज्यात १८७ केंद्रांवर आणि राज्या बाहेरील १० अशा एकूण १९७ केंद्रांवर जाहीर करण्यात आली होती. तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी पीसीएम तर दोन लाख ११ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. या निकालामुळे आता इंजिनीअरिंग प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q6id06
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments