Also visit www.atgnews.com
CBSE: 2021 मध्ये होणार बोर्ड परीक्षा, लवकरच तारखा होणार जारी
CBSE Exams 2021: सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा होणार की होणार नाही याविषयीच्या सर्व शंकाकुशंकांना बोर्डाने पूर्णविराम दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा आयोजित करणार आहे आणि लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. लवकरच सीबीएसईच्या संकेतस्थळावर cbse.nic.in वर याबाबतची सविस्तर माहिती अपडेट केली जाणार आहे. त्रिपाठी म्हणाले, 'बोर्ड परीक्षा निश्चित स्वरुपात होणार आणि लवकरच कार्यक्रम घोषित केला जाणार. सीबीएसई यासंदर्भातील योजना बनवत आहे.' 'मार्च-एप्रिल दरम्यान आम्ही आमची पुढील वाटचाल समोर ठेवली होती. आमच्या शाळा आणि शिक्षकांनी बदल स्विकारला. शैक्षणिक उद्दिष्टांसाठी नव्या तंत्रांचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले. काही महिन्यातच ऑनलाइन वर्ग सुरु झाले. अॅप्स आले,' असेही त्रिपाठी म्हणाले. अंतिम तारखांचे स्वरुप स्पष्ट नाही पुढील वर्षी सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार हे नक्की असले तरी अद्याप अंतिम तारखा निश्चित झालेल्या नाहीत. परीक्षा कशा पद्धतीने होणार याबाबतची देखील कोणतीही माहिती वा घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसाधारणपणे बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवार आणि मार्च महिन्यात आयोजित केल्या जातात. आतापर्यंत गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांनी कोविड -१९ महामारी आणि त्यामुळे झालेलं चालू शैक्षणिक वर्षाचं नुकसान लक्षात घेऊन दहावी, बारावी बोर्ड परीक्षा मे महिन्यापर्यंत पु्ढे ढकलल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे करोना महामारीमुळे खूप नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, काही शाळांनी तेही विलंबाने सुरू केले. दहावी, बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू होण्याबाबतही समानता नाही. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत तर काही ठिकाणी बंद आहेत. परिणामी या दोन राज्यांनी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nP1Wus
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments