मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म; बाल हक्क आयोगाची CBSE ला नोटीस

करोना व्हायरस महामारी स्थितीमुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत आणि ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. ऑनलाइन पद्धतीने सुरु असलेल्या शिक्षणाचे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमामुळे जास्त चांगल्याप्रकारे एखादा विषय समजू शकतो. आरोग्यविषयक खबरदारी घेत घरबसल्या शिक्षण सुरू आहे. पण लहान मुलांना या ऑनलाइन शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईल, लॅपटॉप आणि त्याद्वारे थेट सोशल मीडियाचा अॅक्सेस मिळत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे () ऑनलाइन शिक्षणाच्या व्यासपीठावर बारकाईने लक्ष आहे. शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला () नोटीस पाठवली आहे. सीबीएसईने मुलांच्या वर्गांसाठी सोशल मीडिया कंपन्यांसोबत करार केले. लहान मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे योग्य नाही, कारण ते सुरक्षित माध्यम नाही, अशी टिप्पणी आयोगाने केली आहे. सीबीएसईने फेसबुकसोबत भागीदारी केली आहे. अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात एनसीपीसीआरने सांगितलं आहे की सीबीएसईला ९ नोव्हेंबर रोजी आयोगासमोर उपस्थित राहावे लागेल. आयोगाच्या अध्यक्ष प्रियांका कानूंगो यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली की, 'लहान मुलांसाठी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सुरक्षित नाही. त्यामुळे त्यांना हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याचे इन्व्हाइट पाठवणे योग्य नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे. म्हणून आम्ही सीबीएसई अधिकाऱ्यांकडून यावर स्पष्टीकरण मागवले आहे आणि समन्स पाठवले आहेत.' सीबीएसी बोर्डाने फेसबुकसोबत भागीदारी करत विद्यार्थी, शिक्षकांसाठी डिजीटल सेफ्टी, ऑनलाइन वेल-बिइंग आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीवर अभ्यासक्रम लाँच केला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3k4EdnJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments