CSEET Result 2020: कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल जाहीर

CSEET Result 2020: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) २०२० चा निकाल २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतील. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी या संकेतस्थळावर आपले लॉगइन क्रिडेन्शिअल्स भरून निकाल पाहावा. संकेतस्थळावर उमेदवारांचे विषयनिहाय गुणदेखील उपलब्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की निकालाची वा विषयनिहाय गुणांची कोणत्याही प्रक्रारची प्रत उमेदवारांना मिळणार नाही, असे आयसीएसआयने कळवले आहे. ICSI CSEET Result 2020: कसा पाहाल? - icsi.edu या संकेतस्थळावर जावे. - Result of Company Secretary Executive Entrance Test (CSEET) या पर्यायावर क्लिक करा. - आपल्या क्रिडेन्शिअल्सच्या आधारे लॉग इन करा. - सबमीट करा. - आता ICSI CSEET 2020 नोव्हेंबर परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो डाऊनलोड करा. ICSI CSEET 2020 परीक्षा नोव्हेंबर मध्ये झाली होती. ऐन कोविड १९ परिस्थीतीत परीक्षा झाली होती. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी परीक्षा झाली. उमेदवारांना प्रत्येक विषयात ४० टक्के गुणांची आवश्यकता आहे.या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नाही. निकालाच्या थेट लिंकसाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nXT9Xb
via IFTTT

Post a Comment

0 Comments