Final Year Exams ज्यांची पदवी परीक्षा हुकली, त्यांची परीक्षा दिवाळीनंतर: सामंत

2020: राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाइन आणि अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. या सर्व परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असून काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत () यांनी दिली. कोविड-१९ मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीनंतर १५ दिवासांमध्ये घेण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. आज मंत्रालयात सामंत यांनी सर्व कुलगुरुंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन परीक्षा आणि निकालाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोविड-१९ मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीनंतर १५ दिवासांमध्ये घेण्यासाठी संबंधित विद्यापीठाने नियोजन करावे, तसेच जे विद्यार्थी यावर्षी नापास झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा एक महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. असे सांगून सामंत यांनी कोविडचे संकट असतानासुद्धा सर्व विद्यापीठाने यशस्वीपणे परीक्षा प्रक्रिया यशस्वी राबविली त्याबद्दल सर्व कुलगुरु आणि परीक्षेशी संबंधित असलेले सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. आज काही विद्यापीठांनी निकाल जाहीर झालेल्या विषयांचे प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली. या गुणपत्रिकेमध्ये कोणताही बदल नाही. मागच्या वर्षाप्रमाणेच ही गुणपत्रिका देण्यात आली. तसेच पदवी समारंभामध्येसुद्धा मागच्या वर्षाप्रमाणेच पदवी देण्यात येणार आहे. विद्यापीठाने कोविडच्या पार्श्वभूमिवर सर्व उपाययोजना करुन परीक्षा यशस्वीपणे राबविली. एकाही विद्यार्थ्यांला कोविडची बाधा होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली आहे. तसेच ज्या विद्यापीठांमध्ये परिक्षेसंदर्भात तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यासंदर्भात सत्यशोधन समिती गठीत केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनानुसार शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरुंसोबत बैठक घेवून त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठकीत चर्चा करुन राज्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेवून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. या सर्व परीक्षांचा अहवाल राज्यपाल महोदयांकडे पाठविण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32lJDES
via IFTTT

Post a Comment

0 Comments