Also visit www.atgnews.com
फक्त एका चुकीच्या क्लिकमुळे हुकला अनाथ मुलाचा IIT प्रवेश!
एका लहानशा चुकीमुळे आयआयटी मुंबईतली इंजिनीअरिंगची सीट गमावण्याची वेळ एका विद्यार्थ्यावर आली आहे. १८ वर्षांच्या या मुलाला एकट्या आईने वाढवलं होतं. दोन वर्षांपूर्वी तिचंही निधन झाल्याने तो पोरका झाला होता. जेईईत त्याने २७० वा रँक पटकावला आणि आयआयटी मुंबईत इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी. टेक. साठी त्याला प्रवेश मिळाला, पण तो काहीच दिवसात रद्द झाला. सिद्धार्थ बात्रा असं या मुलाचं नाव असून तो आग्रा येथील आहे. त्याला पहिल्या फेरीत १८ ऑक्टोबर रोजी आयआयटी मुंबईत प्रवेश मिळाला. पण ३१ ऑक्टोबर रोजी त्याने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळी चुकून 'withdraw from seat allocation and further rounds' या लिंकवर क्लिक केलं. परिणामी १० नोव्हेंबरपासून त्याचं नाव प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीतून वगळलेलं दिसलं. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगसाठी ९३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. आता या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा प्रवेश रद्द केल्याच्या विरोधात त्याने ही याचिका दाखल केली. कोर्टाने १९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात आयआयटीला दोन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. आयआयटीने उत्तर दिले की नियमानुसार प्रवेस प्रक्रिया राबवण्यासाठी आयआयटी बांधील आहे. २३ नोव्हेंबरला बात्राची याचिकी फेटाळण्यात आली. आयआयची मुंबईचे कुलसचिव आर. प्रेमकुमार यांनी सांगितले की नियम स्पष्ट आहेत. सर्व प्रवेश जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटीच्या माध्यमातूनच होतात. बात्राने पुढील वर्षी जेईई २०२१ साठी अर्ज करावा, असेही कुलसचिव आर. प्रेमकुमार म्हणाले. बात्रा याने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचे नुकसान टाळण्यासाठी आयआयटीने आणखी जागा वाढवावी अशी मागणी त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. बात्रा त्याच्या आजीआजोबांसोबत राहतो आणि त्याला अनाथांची पेन्शनही मिळते. नेमकी काय चूक झाली? प्रवेश 'फ्रीज' करण्याचा पर्याय निवडला तर जागा गोठून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने फ्रीजचा पर्याय निवडला. मात्र प्रत्यक्षात नियमानुसार फ्रीजचा पर्याय निवडल्यानंतर सीट रद्द होते. सिद्धार्थ बात्रा या विद्यार्थ्याच्या याचिकेवर आता मंगळवारी १ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lgdUf2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments