MHT CET 2020: अतिरिक्त परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT-CET 2020 परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली होती, त्यांच्यासाठी जी अतिरिक्त परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, त्या परीक्षेसाठी हे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते सीईटीचे अधिकृत संकेतस्थळ येथे जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करून घेऊ शकतात. परीक्षेचे PCB आणि PCM ग्रुपचे अतिरिक्त सत्र ७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी केली आहे त्यांनी https://ift.tt/3bs1OMf या सीईटीच्या पोर्टलवर लॉगइन करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. ज्यांना हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक हवी आहे, त्यांच्यासाठी या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि हॉल तिकिट नंबर देऊन लॉग इन करायचे आहे. परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, रिपोर्टिंग टाइम, परीक्षेची तारीख, वेळ अॅडमिट कार्डवर नोंदवण्यात आली आहे. याविषयी परीक्षाविषयक अन्य माहितीसाठी तसेच सर्व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी mahacet.org या सीईटीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहावी. MHT CET 2020 अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी सीईटीच्या वेबसाइटवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jRFezD
via IFTTT

Post a Comment

0 Comments