NIOS बोर्डाचे दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जारी

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. एनआयओएसच्या अधिकृत संकेतस्थळावर .ac.in येथे हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. एनआयओएसची ही परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२० मध्ये होणार होती. पण ती स्थगित करण्यात आली होती. आता ही परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार आहे. संस्थेने जाहीर केलेल्या एनआयओएसच्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा २२ जानेवारीपासून सुरू होतील आणि पहिला पेपर संस्कृत विषयाचा असेल. त्याच वेळी, शेवटचा व्यवसाय अभ्यास पेपर १५ फेब्रुवारी रोजी होईल. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षा २२ जानेवारी पासून हिंदुस्थानी संगीत पेपरपासून सुरू होतील आणि शेवटी रोजगार कौशल्य आणि कर्नाटक संगीत पेपर १५ फेब्रुवारी रोजी होईल. माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यावहारिक डेटाशीट जाहीर केले प्रॅक्टिकल परीक्षा कधी? दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १४ जानेवारीपासून सुरू होतील आणि २५ जानेवारी २०२१ पर्यंत चालतील. जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ परीक्षेसाठी १० डिसेंबरपर्यंत नोंदणी या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी व्हायचे आहे, ते अधिकृत संकेतस्थळ sdmis.nios.ac.in द्वारे परीक्षा शुल्क भरून नोंदणी करू शकतात. दहावी, बारावी वेळापत्रक पुढीलप्रमाणे - निकाल कधी? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने म्हटले आहे की अंतिम परीक्षेनंतर जवळजवळ ६ आठवड्यांनी निकाल जाहीर केला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q0NMs5
via IFTTT

Post a Comment

0 Comments