Also visit www.atgnews.com
केम्ब्रिज विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाला 'या' भारतीयाचे नाव
इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठाच्या रसायनशास्र विभागाला भारतीय शास्रज्ञ डॉ. यांचे नाव देण्यात आले आहे. भारतीय औषधनिर्माण कंपनी '' चे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ.हमीद यांच्या नावाने हा विभाग २०५० सालापर्यंत ओळखला जाणार आहे. यासंबंधीची घोषणा प्रशासनाने मंगळवारी केली. डॉ. हमीद केम्ब्रिज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहे. या विभागाला जागतिक पातळीवर अध्यापन आणि संशोधनाच्या बाबतीत आघाडीवर ठेवण्यात डॉ. हमीद यांचे मोठे योगदान आहे. 'हमीद स्कॉलरशीप प्रोग्राम' च्या माध्यमातून त्यांनी रसायनशास्त्रातल्या जगातल्या अॅकेडमिक टॅलेंटला आर्थिक पाठबल दिले आणि असामान्य कर्तृत्वाचे संशोधक घडवण्यासाठी हातभार लावला. हा विभाग आता 'युसुफ हमीद डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री' या नावाने ओळखला जाणार आहे. या सन्मानाबद्दल डॉ. हमीद म्हणाले, 'केम्ब्रिजने माझ्या केमिस्ट्रीमधील शिक्षणाचा पाया रचला, मला जगायला शिकवलं आणि समाजासाठी द्यायला शिकवलं. मी स्वत: एक स्कॉलरशीप विद्यार्थी होतो, त्यामुळे स्कॉलरशीपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना पाठबळ द्यायला मला आवडेल. मी या विद्यापीठाचा आयुष्यभर ऋणी आहे.' डॉ. हमीद यांचे स्वत:चे कॉलेज क्राइस्ट आणि डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री यांच्या माध्यमातून त्यांचे केम्ब्रिज विद्यापीठाशी ६६ वर्षांचे ऋणानुबंध आहेत. केम्ब्रिज विद्यापीठाचे केमिस्ट्री विभागप्रमुख डॉ. जेम्स कीलर म्हणाले, 'डॉ. हमीद यांचे द्रष्टे पाठबळ आम्हाल भविष्यातील संधींसाठी मोलाचे ठरेल. हमीद यांच्या या शिष्यवृत्तीरुपी भेटीमुळे आम्ही विद्यापीठात असे वैज्ञानिक घडवण्याचा प्रयत्न करू ज्यांच्या संशोधनामुळे जगाला विविध आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ मिळेल.' विकसनशील देशांना एचआयव्ही / एड्सवरील औषधांचा रास्त दरात पुरवढा करून अगणित आयुष्यं वाचवण्याचे काम हमीद यांनी केले आहे. कोविड -१९ महामारी काळातही सिप्लाने हेल्थकेअर संस्थांना स्वस्त दरात औषधांचा पुरवठा केला. केम्ब्रिज विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. स्टीफन जे. टूप म्हणाले, 'केम्ब्रिजमध्ये असतानाही डॉ. हमीद यांनी लोकांची आयुष्य बदलवून टाकणाऱ्या गोष्टींसाठी काम केलं आहे. त्यांच्या शिष्यवृत्तीरुपी भेटीचाही असाच संशोधक विद्यार्थ्यांच्या पुढील कित्येक पिढ्यांना उपयोग होणार आहे.' भारताने २००५ साली हमीद यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला होता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36rGNAD
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments