Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक कॅलेंडर जारी; उन्हाळी सुट्टी फक्त १३ दिवस
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांसाठी विद्यापीठ प्रशासनाने अखेर शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार यंदा कॉलेजांतील विद्यार्थ्यांच्या सुट्टीत कपात होणार असून, अवघ्या १३ दिवसांची मिळणार आहे. याचबरोबर सत्रात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार आवश्यक शैक्षणिक कालावधीही पूर्ण होत नसल्याची टीकाही शिक्षक संघटना करत आहेत. राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्यापीठांना त्यांचा शैक्षणिक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा सर्वच कॉलेजांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकाकडे सर्व कॉलेजांचे लक्ष लागून राहिले होते. कॉलेजांमध्ये नव्या वर्षात नव्या सत्राचा अभ्यास सुरू होईल. यासाठी कॉलेजांची तयारी पूर्ण झाली असून, दुसऱ्या सत्रातही ऑनलाइन लेक्चरद्वारेच विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि आर्किटेक्चर, मॅनेजमेंट स्टडीसह इतर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कॉलेजांनी त्यांचे पहिले सत्र ७ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर दुसरे सत्र १ जानेवारी, २०२१ ते ३१ मे, २०२१पर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. यानंतर १ ते १३ जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी असेल. या वेळापत्रकाच्या आधारे ९० दिवसांचा शैक्षणिक कालावधी पूर्ण होत नसल्याची टीका शिक्षक संघटनांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाने उपकेंद्रासाठीही वेळापत्रक जाहीर केले आहे. ठाणे उपकेंद्रातील बीएमस आणि एमएमएस अभ्यासक्रमासाठी देखील वेळापत्रक जाहीर केले आहे. असे आहे वेळापत्रक पहिले सत्र : ७ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर, २०२० दुसरे सत्र : १ जानेवारी ते ३१ मे, २०२१ उन्हाळी सुट्टी : १ जून ते १३ जून, २०२१ प्रथम वर्षासाठी नवे वेळापत्रक? इंजिनीअरिंग, एमबीए, विधी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यामुळे प्रथम वर्षासाठी हे वेळापत्रक लागू होऊ शकणार नाही. यामुळे यासाठी विद्यापीठ स्वतंत्रपणे पुन्हा वेळापत्रक जाहीर करणार आहे का, असा प्रश्नही प्राध्यापक विचारत आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WIlBkk
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments