Also visit www.atgnews.com
अभाविपच्या नऊशे नि:शुल्क शाळा
निखिल भुते, नागपूर नागपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. स्मार्टफोन, टॅब्लेट, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि नानाविध अॅपच्या माध्यमातून शिक्षणाची ही 'स्मार्ट' गंगा वाहत आहे. मात्र, या सर्व सुविधांची वानवा असलेल्यांच्या आयुष्यातून शिक्षण कायमचे 'ऑफ' होऊ नये, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे () संपूर्ण देशभरात नऊशेहून अधिक नि:शुल्क शाळा सुरू आहेत. ज्यामुळे वंचितांसाठी शिक्षणाची कवाडे 'ऑन' झाली आहेत. जागतिक महामारीने आरोग्याच्या समस्येसह विविध नव्या प्रश्नांना जन्म दिला आहे. प्रत्यक्ष शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. परंतु, हातावर पोट असणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी स्मार्टफोनवर शिक्षण घेणे स्वप्नातही शक्य नाही. अशा स्थितीत अभाविप या विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेत '' या नावाने गरीब वस्त्यांमध्ये सुरू केली आहे. विद्यार्थ्याच्या इयत्तेनुसार, त्याचा अभ्यासक्रम पूर्वीच्या प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीप्रमाणे पूर्ण करण्यात येत आहे. दहा ते पंधरा जणांचा समूह तयार करून स्वयंसेवक आणि सेवाभावी शिक्षकांद्वारे झोपडपट्टी वस्त्यांमध्ये अशा प्रकारची शाळा सुरू आहे. यामध्ये गणित, विज्ञान, इंग्लिशसह सर्व विषयांचा अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे. याबाबत अधिक सांगताना विदर्भ प्रांतमंत्री रवी दांडगे म्हणाले,'नागपुरात खरबी, शिवाजीनगर झोपडपट्टी, गवळीपुरा, काचीपुरा, अमरनगरसह ग्रामीण भागांमध्ये शाळा सुरू आहे. त्याशिवाय विदर्भातील अकोला, भंडारा, चंद्रपूर, वाशीम येथे या प्रकारच्या शाळांला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.' शाळांची संख्या वाढणार आधुनिक तंत्रज्ञानाअभावी शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, या उद्देशाने नि:शुल्क शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार, यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती अभाविपचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक राहुल चौधरी यांनी दिली. 'परिषद की पाठशाला' दृष्टिक्षेपात एकूण जिल्हे - २४३ एकूण शाळा पाठशाला - ९०६ एकूण विद्यार्थी - ५,०८८
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34Iu3oi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments