Also visit www.atgnews.com
CBSE Exams 2021: सीबीएसई दहावी,बारावी परीक्षा ऑफलाइनच होणार
CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच (Offline mode) होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाइन होण्याची शक्यता नाही. बोर्डाने हेही स्पष्ट केल ेआहे की जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध केला जाईल. सीबीएसई बोर्डाने एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की, 'बोर्डाच्या परीक्षा जेव्हा होतील तेव्हा त्या लेखी आणि ऑफलाइन पद्धतीनेच होतील. ऑनलाइन पद्धतीने होणार नाहीत. कोविड प्रोटोकॉल पाळून परीक्षांचे आयोजन केले जाईल.' मात्र परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील, याबाबत बोर्डाने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. संबंधितांशी विचारविनिमयाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी १० डिसेंबर रोजी परीक्षांसंदर्भात संवाद साधणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षा सर्वसामान्य परिस्थितीत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जातात. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. आतापर्यंत विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विविध विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कशा होणार याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषत: बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी अधिक चिंतेत आहेत, कारण त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० गुण असतात. दरम्यान, बोर्डाने यापूर्वीच परिस्थिती लक्षात घेऊन ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी कोणताही बदल नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. दिल्ली सरकारने आणखी अभ्यासक्रम कमी करण्याचीही मागणी केली होती. दुसरीकडे, बोर्डाने पेपर पॅटर्न बदलत विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. एमसीक्यू प्रश्नांवर यंदा अधिक भर दिला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ojDiCs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments